Friday, January 18, 2019

गरिबाची गाय शेळी झाली महाग


गरिबाची गाय शेळी झाली महाग

सर्वसामान्यांची गरिबांची गाय अर्थात शेळी महाग झालेली आहे आणि भविष्यात ती जास्त भाव खाईल यात शंका नाही. त्यासाठी योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने शेळी संगोपन करण्याची गरज आहे.
·                  महाराष्ट्रासारख्या दुष्काळी, कमी पर्जन्यमान तसेच जमिनीमध्ये वैविध्यता असलेल्या राज्यामध्ये शेती व्यवसायाचा महत्त्वाचा कणा म्हणजे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय. दुग्धव्यवसायामध्ये गाई आणि म्हशी यांची संख्या वाढून उत्पादनात वाढ झाली; परंतु शेळीपालनामध्ये पाहिजे त्या प्रमाणात बदल झाला नाही. पूर्वीपासूनच शेळीपालन व्यवसायालाही शेती व्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण शेळीला गरिबाची गाय संबोधण्यात आलेले आहे. शेळी हा लहान प्राणी कमी चारा, कमी पाण्यामध्ये शेळीचे पालनपोषण करता येते, तसेच विकत घेण्यासाठी आणि सांभाळ करण्यासाठीही फार खर्च येत नाही. त्यामुळे पूर्वीपासून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असो की शेतमजूर, त्याच्या दारासमोर शेळी असायची. तसेच शेळीचा आणखी एक फायदा होता तो म्हणजे एनी टाइम मिल्क. म्हणजेच केव्हाही वाटले, की शेळीचे दूध काढून आलेल्या पाहुण्यांना चहा करताना दुधाचा प्रश्न सुटायचा. परंतु, आज याच शेळीपालनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे, ही चांगली बाब आहे.
आपल्या देशामध्ये पूर्वीपासून शेतीला आधार देण्याचे काम पशुपालन या व्यवसायाने केले आहे. त्याचमुळे शेती व्यवसायाच्या एकूण उत्पादनामध्ये २५ ते २६ टक्के वाटा पशुपालन व्यवसायाचा आहे, तर देशाच्या एकूण सकल उत्पादनापैकी ४.११ टक्के वाटा पशुपालन व्यवसाय उचलते. महाराष्ट्राचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. परंतु, २००७ च्या पशुगणनेपेक्षा २०१२ च्या पशुगणनेमध्ये एकूण पशुधनाची संख्या ३.४२ टक्क्यांनी घटली, ही मात्र चांगली बाब नाही. यामध्ये शेळ्यांचा विचार केला, तर देशामध्ये २०१२ च्या पशुगणनेनुसार १३.५१ कोटी शेळ्यांची संख्या आहे. यात मागील पाच वर्षांत ३.८२ टक्क्यांनी घट झाली. देशामध्ये एकूण पशुधनापैकी शेळ्यांची संख्या २६.४० टक्के आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर शेळ्यांच्या प्रमाणात मागील
 पाच वर्षांत १८.८२ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली. २०१२ च्या पशुगणनेनुसार, महाराष्ट्रात ८४.३२ लाख शेळ्यांची संख्या असून, ती देशातील एकूण शेळ्यांच्या ६.२१ टक्के आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ लाख शेतकऱ्यांकडे शेळ्या आहेत. देशामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश हे शेळीपालनामध्ये महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर आहेत. शेळ्यांच्या या परिस्थितीचा आढावा घेत असताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मटणाच्या दरामध्ये होत असलेली वाढ. खरं तर शेळीपालन व्यवसायाला मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे. समाजामध्ये अशी चर्चा
आहे, की गोवंश हत्या बंदीमुळे शेळीचे मटण पर्याय असल्यामुळे मोठी मागणी वाढली आणि त्यामुळे शेळीपालनाला एक चांगली संधी निर्माण झालेली आहे; परंतु मागील एक दशकाचा विचार केला तर मटणाचे दर दुपटीने वाढले आहेत. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण मटण उत्पादनामध्ये शेळीचा २३ टक्के वाटा असून, गाई (२५ टक्के), म्हशी (३८ टक्के), मेंढी (११ टक्के), डुकरे (२ टक्के) याप्रमाणे प्रत्येकाचा वाटा आहे. म्हणजेच शेळीच्या मटणाची मागणी यापूर्वीही होती
आणि यापुढेही राहणार आहे. जगामध्ये चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर शेळीच्या मटणाचे उत्पादन करणारा देश आहे. परंतु, आजही एकूण उत्पादनाच्या केवळ ६.४ टक्के मटण निर्यात होते. भारतामध्ये एकूण ३२ प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आहेत. त्यापैकी ६ ते ७ जातीच प्रामुख्याने हवामानानुसार पाळल्या जातात.
ऑस्ट्रेलिया शेळीपालनाच्या निर्यातीत आघाडीवर होता; परंतु भारतातील शेळ्यांच्या मटणाची चांगली चव तसेच फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे भारतातून शेळीच्या मटणाची निर्यात वाढत आहे. निर्यातीबरोबर देशांतर्गत मागणीही वाढत आहे. दरडोई दर वर्षी १०.९० किलो मटणाची गरज असताना सध्या देशात ६ किलो, तर महाराष्ट्रामध्ये २.२६ किलो उपलब्ध आहे. देशामध्ये २०२० पर्यंत याचे प्रमाण ७.४ किलो अपेक्षित धरले तरीही २४ ते २५ कोटी शेळ्यांची आवश्यकता आहे. ज्याचे प्रमाण सध्या फक्त १३.५० कोटी आहे. गाईपासून मटण तयार करायला प्रतिकिलो १५,५०० लिटर पाणी लागते, तर शेळीच्या मटणाला फक्त ४००० लिटर पाणी लागते. म्हणजेच महाराष्ट्रासारख्या पाणीटंचाईच्या राज्यासाठी शेळीपालन निश्चितच किफायतशीर आहे. म्हणजेच शेळीपालनाला देशांतर्गत बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठीही मोठी मागणी राहणार आहे. शेळीचा विचार मटणाबरोबरच दुधासाठी करावा लागणार आहे. कारण पूर्वीपासून लहान मुलांना आईच्या दुधानंतर शेळीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते. शेळीच्या दुधामध्ये अनेक उपयुक्त घटक असून प्रतिकारक्षमता वाढते. हृदयाचे आजार कमी करते; तसेच वजनावर नियंत्रण करून पोटाचे विकार कमी करायला शेळीचे दूध उपयुक्त आहे. शेळीचे दूध प्रक्रिया करायलाही सोपे आहे. याचा विचार करून जागतिक पातळीवर शेळीच्या दुधाला मागणी वाढत आहे. आज राज्यामध्ये फक्त २.७७ लाख टन शेळीच्या दुधाचे उत्पादन होते हे एकूण दुधाच्या फक्त ४ टक्के उत्पादन आहे. जगामध्ये एकूण दूध उत्पादनापैकी फक्त २ टक्के दूध शेळीचे आहे. भविष्यात शेळीच्या दुधाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. शेळीच्या दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनविले आणि त्याची बाजारपेठ तयार करण्याचा एक प्रवाह सुरू होत आहे. अर्थात आज शेळीच्या दुधाची उत्पादकता फक्त २१९ मि.लि./ शेळी/ दिवस आहे.
·                  सर्वसामान्यांची गरिबांची ही गाय महाग झालेली आहे आणि भविष्यात ती जास्त भाव खाईल, यात शंका नाही. अर्थात त्यासाठी योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याची गरज आहे. शेळीपालन फक्त दारासमोर शेळ्या बांधणे ही पारंपरिक पद्धतीऐवजी
·शेळीपालनाकडे व्यावसायिक आणि व्यापारी तत्त्वाने बघितले तर फार मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ आणि रोजगारनिर्मिती होईल.
(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद


Thursday, January 17, 2019

रासायनिक शेतीचे दुष्परीणाम


रासायनिक शेतीचे दुष्परीणाम



1) जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.
सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.
2) 1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.
3) महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्‍या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली.
खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.


(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद


Wednesday, January 16, 2019

मुक्त संचार गोठा


मुक्त संचार गोठा


पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष
भारतीय दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत  आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली.
उदाहरणार्थ,
एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना  होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात. त्याच  बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन  करण्याची सरासरी ही फारच कमी आहे. ९० टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादका कडे २ ते ३ याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची संख्या व वंशावळी ची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य नाही.
पारंपरिक गोठा
दुग्धव्यवसायातील अपयशाची कारणे*
दुभत्या गाई व म्हशींची प्रति दूध उत्पादक शेतकरी संख्या मर्यादित राहण्याची प्रमुख दोन कारणे पुढील प्रमाणे आहेत.पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करताना दिवसभर अति कष्ट करावे लागणे.दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो.संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन नसणे.दूध धंद्यामध्ये हमखास बक्कळ उत्पन्नासाठी काय कराल
दिवसभरातील अति कष्ट वाचावेत यासाठी मुक्तसंचार  गोठा व वर्षभराच्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन व्हावे म्हणून मुरघास निर्मिती केली पाहिजे.
दुभत्या गाईचे संगोपन करताना त्यांच्या साठी मुक्तसंचार  गोठा पद्धतीचा अवलंब करावा.  यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व गाईचे स्वास्थ्य देखील चांगले राहते.  परिणामतः दूध उत्पादनात वाढ होते.
मुक्तसंचार गोठा पद्धतीची माहिती घेऊया
मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय
मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.शेण वारंवार काढले जात नाही.गाई एकेमकाना मारत नाहीत.आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे.  वरील सर्व गोष्टी खालील माहिती द्वारे स्पष्ट होतील.
मुक्त संचार गोठा
एका गाईला किंवा म्हैशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्या साठी कमीत कमी २०० चौ. मी. जागा लागते. एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्या पूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करून आत मध्ये गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते.  गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात.या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी.  गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात.  परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत.  जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या  गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट  घालणे होय. अशा प्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो.

मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याचे फायदे
1) कमी खर्च
या पद्धतीचा गोठा हा कमीत कमी खर्चात सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी करू शकतो.
2) निर्जंतुक गोठा
तार-जाळी व लोखंडी अँगल च्या साहाय्याने कंपाउंड करून कोणत्याही एका बाजूला गव्हाण केली जाऊ शकते.  शक्यतो वैरण खाताना गाईंचे तोंड सूर्याच्या उगवत्या किंवा मावळत्या दिशेला असावे, जेणेकरून  गोठा कोरडा व निर्जंतुक राहण्यास मदत होते.  यामुळे गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्ताइटिस ) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते.
3) सावली आणि रोगप्रतिकारक शक्ती
संकरित गाईंचा सांभाळ करताना त्यांना वर्षभर चांगली सावली व बसण्यासाठी कोरडी जागा लागते.  मुक्तसंचार  गोठ्या मध्ये झाडांची, किंवा शेडची सावली गाईंना लाभदायक ठरते.  उन्हाळ्याच्या किंवा उन्हाच्या वेळी धापा टाकण्याचे प्रमाण कमी होते.  यामुळे गाईंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारकशक्ती टिकण्यास मदत होते. परिणामतः दूध उत्पाद वाढ होते ..
4) माज येणे
गाई व वासरे मुक्त असल्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होऊन शरीराची संतुलित वाढ होते.  गाई चांगल्या प्रकारे माजावर येतात.  माजाची लक्षणे लवकरात लवकर ओळखता येतात.  गाय माजावर आली कि बाहेर काढावी व कृत्रिम रेतन करून माज कमी झाल्यावर पुन्हा गोठ्यात सोडावी.
5) पिण्याचे पाणी आणि दूध देण्याची मात्रा
पाणी पिण्याच्या हौदामध्ये किंवा कुंडीत गाईंना तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळते.  हिरवा चारा, वाळला चारा व पिण्याचे पाणी या सर्व माध्यमातून जेव्हा गाईच्या शरीरात ४-५ लिटर पाणी जाते, तेव्हा गाईच्या कासेमध्ये कमीतकमी एक लिटर दूध तयार होते.  यामुळे तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळणे महत्त्वाचे आहे.   यासाठी मुक्त गोठा हा एकमेव पर्याय आहे.
6) खरारा
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्या मध्ये गाईंना खरारा करणे सोपे जाते.  यासाठी एखादा खांब मधोमध रोवून, त्यावर नारळाचा काथ्या ओला करून गुंडाळावा.  गाई त्यावर आपले शरीर घासण्याचा प्रयत्न करतात.  यामुळे गाई तणावमुक्त होऊन त्यांची त्वचा व्यवस्थित राहते.
7) शण आणि मेंटेनन्स
दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो. परंतु मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेण महिन्यातून एकदा काढले तरी चालते.  सूर्यप्रकाशामुळे शेण वाळते जाऊन शेणखताची भुकटी तयार होते. त्यामध्ये गाईची लघवी मिसळली गेल्याने उत्तम प्रकारचे शेणखत तयार होते.  त्याचबरोबर होमनी नावाच्या किड्याची निर्मिती सुद्धा या भुकटी झालेल्या खतामध्ये होत नाही.  हे शेणखत शेती चे उत्पादन वाढविण्यास उपयोगी पडते.  मुक्त गोठा पद्धतीमध्ये फक्त पावसाळ्या मध्ये पाऊस चालू असे पर्यंत  दररोज शेण उचलावे लागते..
8) मजुरी खर्च
मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जनावरांची जागा बदलणे, शेण उचलणे, पाणी पाजणे ही तिन्ही कामे करण्याची आवश्यकता राहत नाही.  कष्ट वाचते, वेळ वाचतो.  याचा परिणाम म्हणजे मजुरांवरील खर्च वाचतो.  मजुरांचे प्रमाण कमी लागते, म्हणून कमीत कमी मजुरांमध्ये जास्तीत जास्त गाईंचा सांभाळ शक्य होतो.
9) गाईंचे संरक्षण
गाईभोवती कंपाउंड असल्याने रानटी प्राणी किंवा पिसाळलेले कुत्रे यापासून गाईंचे संरक्षण फक्त मुक्त संचार गोठ्या मधेच शक्य आहे.  प्रत्येक वयोगटाच्या जनावरांची व्यवस्था स्वतंत्रपणे करता येते.  व्यायलेल्या गाई, गाभण गाई व वासरे यांचे कप्पे स्वतंत्र केल्याने चारा व खुराक (पशुखाद्य) उत्पादनाप्रमाणे देणे सोयीचे जाते.  त्यामुळे अनावश्यक खर्च वाचून बचत होते. नफ्यात वाढ होते.
10) निरोगी गाई
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामुळे गाईंमधील आजारांचे प्रमाण देखील कमी होते.

आजच्या या लेखात आपण दुग्धव्यवसाय करताना मुक्त संचार गोठा पद्धतीचे महत्त्व  शिकलो. मुक्त संचार गोठा हि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नफ्याची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.  या पद्धती चा अवलंब आपण करावा व इतरांनाही प्रवृत्त करावे...
 (हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद