Tuesday, January 15, 2019

शेळी पालन एक शेती पुरक व्यवसाय


शेळी पालन एक शेती पुरक व्यवसाय

 शेळी पालन करण्या साठी नोकरदार,शेतकरी किंवा सामान्य माणसाचे छोटे~मोठे 5-50 फार्म पहा,आपल्याला आत्मविश्वास येतो आयडीया मिळतात,आपल्या गरजे ऐपतीनुसार शेड बांधा,फालतु वाढीव खर्च टाळा,प्रथम प्रशिक्षण घ्या,आणि सुरवात करताना शक्यतो लोकल शेळी घ्या आणि तिला संकरित नर घेऊन संकरित आणि लोकल शेळी पासुन ज़ात विकसीत करा,गोट फार्म ची मार्केटिंग करा,डझन भर पुस्तके वाचा,
यशस्वी वाटचाल करतांना
आकर्षण, प्रयोगशीलता, नक्कीच असावी पण यशस्वी वाटचाल करतांना, अनुभव संपन्न झाल्यावर! सुरुवातीलाच रिस्क आणि प्रयोग नको.....मोठा पैसा खर्चून प्रयोग फसला तर रडत बसण्याशिवाय पर्याय नसतो.....
या सर्व प्रपंचात माझा कोणाही  नामांकित जातीच्या शेळीपालकांवर किंवा त्यांच्या विक्री कौशल्यावर आक्षेप अजिबात नाही त्यांनी त्यांच्या अनभवाचा, सोशल नेटवर्कींगचा त्याच्या व्यावसाय वाढीसाठी कोणते कौशल्य वापरावे हा ज्याचा त्याचा भाग आहे.
 प्रश्न आहे तो निवोदित शेळीपालकांचा, आपल्याला कोणी स्वताच्या अल्प फायद्यासाठी वापरुन घेऊ नये याची त्यांनी डोळसपणे खबरदारी घ्यावी.कारण आपल्या भारतीय माणसाची एक व्यावसायिक अडचण अशी आहे की आम्ही एखाद्या ऊच्च दर्जाच्या मालाचे विक्रमी ऊत्पादन करु शकतो मात्र ऊत्पादीत मालाच्या विक्री कौशल्यात आम्ही माती खातो...शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, पहा
शेळीपालन व्यावसायाशी निगडीत तसेच या व्यावसायाशी नव्याने जोडू
पाहणा-या तसेच हा व्यावसाय करु ईचि्छणा-या तमाम सहकारी बांधवांना नम्र विनंती आहे की ब-याचदा ग्रुपवर चर्चा करतांना निवोदित शेळीपालक बांधव आफ्रिकन बोर, बिटल, शिरोही, जमनापारी, बारबरी,सुरती ईत्यादी महागड्या जातींच्या शेळ्याबद्दलच अधिक चविने चर्चा करतांना दिसतात...
      हा व्यावसाय नव्याने करु पाहत असलेल्या व सुरु केलेल्या माझ्या तमाम सहकारी बांधवांना आपल्याला या व्यावसायात पाय घट्ट रोवायचा असेल जम बसवून नफा कमवायचा असेल तर सांगीव, एकीव माहितीवरुन सुरुवातीलाच या महागड्या शेळ्यांच्या जातींच्या मागे लागू नका. आपल्या परिसरातील लोकल जातीच्या, *(पारंपारीक गावठी जातीच्या)*  फारफार तर ऊस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन करुन शेळीच्या आणि सबंध शेळीपालनाच्या या व्यावसाय चक्राचे आवलोकन करा. समस्या, ऊपाय, व्यावस्थापन, हक्काचे शाश्वत मार्केट, आणि नफा कमावण्याची शक्कल व्यावस्थित जमली तरच प्रयोग म्हणून बोर, बिटल, जमनापारी, सुरती, शिरोही, बारबेरी या पैकी एखाद जातीच्या संगोपनाचा विचार करावा....
         एक साधा विचार करा... समजा या महागड्या जातींच्या शेळ्यांचे संगोपन करुनही या आपल्याकडे लोकल मार्केटमधे चालू प्रचलीत दरांनुसारच विकावे लागणार असेल तर ... या महागड्या जातींचे संगोपन म्हणजे एक मृगजळच ठरेल.
        ऊदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात घ्या जर लोकल जातीचा बकरा बाजारात दलाल किंवा मटन शॉपवाले सरासरी 220-240 किलो ने घेत असतील तर 25-30 किलो वजनाच्या बक-याचेही अदाजे सरासरी सुमारे 5500-6500 मिळतील ही आपली अपेक्षा असते किंवा तेवढे मिळावे हा अट्टहास असतो. पण एकंदरीतच दलाल किंवा मटन विक्रेत यांची व्यावसायीक पालिसी पाहता ते लोक गरिब शेळीसारखाच शेळीपालकाला समजून सरासरी 4000 ते 4300 च्या वर भाव द्यायला सहजा सहजी तयारच होत नाहीत... परिणाम स्वरुप शेळीपालक आपल्या व्यावसायीक मर्यादा व आर्थिक निकड लक्षात घेऊन नाविलाजास्तव या चक्रव्यहात सापडतो व नफा तोटा याचा जास्त विचार न करता आपल्या पशूची विक्री करत राहतो....
बरं हे गणित एखाद दुस-या पशुंच्या विक्रीबाबत कोणीही सहन करेल हो... पण आता व्यावसाय म्हणून सतत वाढ होणारे हे पशुधन अशा पध्दतीने या भावात विकने हे शहानपणाचे लक्षण नाही हे कोणत्याही वेड्यालाही कळेल पण..... ऊपाय तरी काय या परंपरेला...? कोणत्या बाजारात तुम्हाला तुमच्या मालाला मनाजोगी किंमत मिळनार आहे.? कोणत्या जातीच्या भावची हमी काहीच ठरलेली नाही.? शेळ्याची वजनानुसार विक्री व किलोनुसार दर हे ऐकायला बरं वाटतं..... प्रत्यक्षात मात्र अवघड आहे
*प्रती किलो वजनानुसार विक्री*  हा फंडा फक्त शेळीपालन व्यावसायात नविन येणा-या लोकाना अडकवण्यासाठीच आहे असं किमान मला तरी वाटतं....
कारणही तसंच आहे हो नवखे असतात, य़ा व्यावसायाबद्दल मोठमोठ्या गोष्टी एेकलेल्या असतात, नामांकित वाटसअप ग्रुपचे सदस्य असतात, वाटसअप फेसबूक वर यशोगाथा पाहिलेल्या असतात, आधुनिक फार्मस् 😂 पाहिलेले असतात मग काय या मोहजालाला फसुन, आगतिक होऊन हाती असलेला पैसा बिनधास्तपणे गुंतवणार हे काहीजण हेरुनच असतात. अन त्यातच आपल्याकडील नामांकीत जाती चढ्या भावाने आगदी 1500-2000 प्रति किलोन विक्री करतात....
यांनी या भावाने आपल्याकडील 40-50 बकरे एकदाच विकुन दाखवावेतच.त्यांना फक्त आपल्यासारखे निवोदित ग्राहकच सापडतात.(मग कापतात चांगलंच आपल्याला बकरा समजून)
हे दाखवतात,भासवतात तेवढा यांचा ग्राहक वर्ग कधीच मोठा नसतो तर फक्त 2-4 शेळ्या घेणारा एखादा निवोदीतच असतो. म्हणूनच हे वाटसअपच्या पाच-पन्नास ग्रुपचे सदस्य असतात अन तिथं आपली मार्केटींग करतात *2 male or 4 female  Shirohi/ bore/beetal for sale 6 month 40 Kg rate 1500per Kg* अशा यांच्या जाहिराती असतात.
फार्म विजीटच्या मोठमोठ्या फिस असतात अन आपन निवोदीत या जाळात फसतच जातो.
ऊलट एकही दलाल, व्यापारी, मटन विक्रेता या फंद्यात पडत नाही..
नगानुसार किंमत ठरवतो, सांगतो, द्यायचा तर द्या नाही तर जा असा मस्त सुरही एकवतो...
कारण त्याला माहिती आहे  ग्राहकांना लोकल जातीचे मटन ही 400-450  किलोनेच विकायचे आहे आणि बोऱ,शिरोही,बिटल,जमनापारी या जातीचे मटणही ग्राहक त्याच भावानं विकत घेणार...!
ऊच्च, भारदस्त, देखण्या जातीच्या बक-याचं मटन आहे म्हणून ग्राहक थोडेच जास्त पैसे देणार आहे.....?
तेंव्हा नविन शेळीपालकांनी तुर्तास तरी या महागड्या जातींच्य मागे न लागता आपल्या बाजारात कोणती शेळी लवकर व कोणत्या पध्दतीनं (नगावर की किलोवर) विकली जाते त्यांचेच संगोपन करा बाकी व्यावसायाच्या सुरुवातीलाच ही आमुक जात अशी तमुक जात तशी याच्या मागे लागून पैसा वेळ मेहनत व्यार्थ घालू नका.
(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद


No comments:

Post a Comment