Friday, January 18, 2019

गरिबाची गाय शेळी झाली महाग


गरिबाची गाय शेळी झाली महाग

सर्वसामान्यांची गरिबांची गाय अर्थात शेळी महाग झालेली आहे आणि भविष्यात ती जास्त भाव खाईल यात शंका नाही. त्यासाठी योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने शेळी संगोपन करण्याची गरज आहे.
·                  महाराष्ट्रासारख्या दुष्काळी, कमी पर्जन्यमान तसेच जमिनीमध्ये वैविध्यता असलेल्या राज्यामध्ये शेती व्यवसायाचा महत्त्वाचा कणा म्हणजे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय. दुग्धव्यवसायामध्ये गाई आणि म्हशी यांची संख्या वाढून उत्पादनात वाढ झाली; परंतु शेळीपालनामध्ये पाहिजे त्या प्रमाणात बदल झाला नाही. पूर्वीपासूनच शेळीपालन व्यवसायालाही शेती व्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण शेळीला गरिबाची गाय संबोधण्यात आलेले आहे. शेळी हा लहान प्राणी कमी चारा, कमी पाण्यामध्ये शेळीचे पालनपोषण करता येते, तसेच विकत घेण्यासाठी आणि सांभाळ करण्यासाठीही फार खर्च येत नाही. त्यामुळे पूर्वीपासून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असो की शेतमजूर, त्याच्या दारासमोर शेळी असायची. तसेच शेळीचा आणखी एक फायदा होता तो म्हणजे एनी टाइम मिल्क. म्हणजेच केव्हाही वाटले, की शेळीचे दूध काढून आलेल्या पाहुण्यांना चहा करताना दुधाचा प्रश्न सुटायचा. परंतु, आज याच शेळीपालनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे, ही चांगली बाब आहे.
आपल्या देशामध्ये पूर्वीपासून शेतीला आधार देण्याचे काम पशुपालन या व्यवसायाने केले आहे. त्याचमुळे शेती व्यवसायाच्या एकूण उत्पादनामध्ये २५ ते २६ टक्के वाटा पशुपालन व्यवसायाचा आहे, तर देशाच्या एकूण सकल उत्पादनापैकी ४.११ टक्के वाटा पशुपालन व्यवसाय उचलते. महाराष्ट्राचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. परंतु, २००७ च्या पशुगणनेपेक्षा २०१२ च्या पशुगणनेमध्ये एकूण पशुधनाची संख्या ३.४२ टक्क्यांनी घटली, ही मात्र चांगली बाब नाही. यामध्ये शेळ्यांचा विचार केला, तर देशामध्ये २०१२ च्या पशुगणनेनुसार १३.५१ कोटी शेळ्यांची संख्या आहे. यात मागील पाच वर्षांत ३.८२ टक्क्यांनी घट झाली. देशामध्ये एकूण पशुधनापैकी शेळ्यांची संख्या २६.४० टक्के आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर शेळ्यांच्या प्रमाणात मागील
 पाच वर्षांत १८.८२ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली. २०१२ च्या पशुगणनेनुसार, महाराष्ट्रात ८४.३२ लाख शेळ्यांची संख्या असून, ती देशातील एकूण शेळ्यांच्या ६.२१ टक्के आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ लाख शेतकऱ्यांकडे शेळ्या आहेत. देशामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश हे शेळीपालनामध्ये महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर आहेत. शेळ्यांच्या या परिस्थितीचा आढावा घेत असताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मटणाच्या दरामध्ये होत असलेली वाढ. खरं तर शेळीपालन व्यवसायाला मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे. समाजामध्ये अशी चर्चा
आहे, की गोवंश हत्या बंदीमुळे शेळीचे मटण पर्याय असल्यामुळे मोठी मागणी वाढली आणि त्यामुळे शेळीपालनाला एक चांगली संधी निर्माण झालेली आहे; परंतु मागील एक दशकाचा विचार केला तर मटणाचे दर दुपटीने वाढले आहेत. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण मटण उत्पादनामध्ये शेळीचा २३ टक्के वाटा असून, गाई (२५ टक्के), म्हशी (३८ टक्के), मेंढी (११ टक्के), डुकरे (२ टक्के) याप्रमाणे प्रत्येकाचा वाटा आहे. म्हणजेच शेळीच्या मटणाची मागणी यापूर्वीही होती
आणि यापुढेही राहणार आहे. जगामध्ये चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर शेळीच्या मटणाचे उत्पादन करणारा देश आहे. परंतु, आजही एकूण उत्पादनाच्या केवळ ६.४ टक्के मटण निर्यात होते. भारतामध्ये एकूण ३२ प्रकारच्या शेळ्यांच्या जाती आहेत. त्यापैकी ६ ते ७ जातीच प्रामुख्याने हवामानानुसार पाळल्या जातात.
ऑस्ट्रेलिया शेळीपालनाच्या निर्यातीत आघाडीवर होता; परंतु भारतातील शेळ्यांच्या मटणाची चांगली चव तसेच फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे भारतातून शेळीच्या मटणाची निर्यात वाढत आहे. निर्यातीबरोबर देशांतर्गत मागणीही वाढत आहे. दरडोई दर वर्षी १०.९० किलो मटणाची गरज असताना सध्या देशात ६ किलो, तर महाराष्ट्रामध्ये २.२६ किलो उपलब्ध आहे. देशामध्ये २०२० पर्यंत याचे प्रमाण ७.४ किलो अपेक्षित धरले तरीही २४ ते २५ कोटी शेळ्यांची आवश्यकता आहे. ज्याचे प्रमाण सध्या फक्त १३.५० कोटी आहे. गाईपासून मटण तयार करायला प्रतिकिलो १५,५०० लिटर पाणी लागते, तर शेळीच्या मटणाला फक्त ४००० लिटर पाणी लागते. म्हणजेच महाराष्ट्रासारख्या पाणीटंचाईच्या राज्यासाठी शेळीपालन निश्चितच किफायतशीर आहे. म्हणजेच शेळीपालनाला देशांतर्गत बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठीही मोठी मागणी राहणार आहे. शेळीचा विचार मटणाबरोबरच दुधासाठी करावा लागणार आहे. कारण पूर्वीपासून लहान मुलांना आईच्या दुधानंतर शेळीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते. शेळीच्या दुधामध्ये अनेक उपयुक्त घटक असून प्रतिकारक्षमता वाढते. हृदयाचे आजार कमी करते; तसेच वजनावर नियंत्रण करून पोटाचे विकार कमी करायला शेळीचे दूध उपयुक्त आहे. शेळीचे दूध प्रक्रिया करायलाही सोपे आहे. याचा विचार करून जागतिक पातळीवर शेळीच्या दुधाला मागणी वाढत आहे. आज राज्यामध्ये फक्त २.७७ लाख टन शेळीच्या दुधाचे उत्पादन होते हे एकूण दुधाच्या फक्त ४ टक्के उत्पादन आहे. जगामध्ये एकूण दूध उत्पादनापैकी फक्त २ टक्के दूध शेळीचे आहे. भविष्यात शेळीच्या दुधाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. शेळीच्या दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनविले आणि त्याची बाजारपेठ तयार करण्याचा एक प्रवाह सुरू होत आहे. अर्थात आज शेळीच्या दुधाची उत्पादकता फक्त २१९ मि.लि./ शेळी/ दिवस आहे.
·                  सर्वसामान्यांची गरिबांची ही गाय महाग झालेली आहे आणि भविष्यात ती जास्त भाव खाईल, यात शंका नाही. अर्थात त्यासाठी योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याची गरज आहे. शेळीपालन फक्त दारासमोर शेळ्या बांधणे ही पारंपरिक पद्धतीऐवजी
·शेळीपालनाकडे व्यावसायिक आणि व्यापारी तत्त्वाने बघितले तर फार मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ आणि रोजगारनिर्मिती होईल.
(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद


No comments:

Post a Comment