Friday, January 11, 2019

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात

shintreagro.com

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात

·      ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे. 

·      शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो.

·      गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात.

·      सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे.

·      2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात.

·      बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात.

·      सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे.

·      शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्न भेडसावत असतात, ज्यांची ना मिळाल्या मुळे शेळीपालन पासून ते दूर चालले आहेत. असे कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया

शेळीपालन करताना पडलेले प्रश्न

·      जास्त संख्येने शेळीपालन कसे करायचे ?

·      बंदिस्त शेळीपालन कसे करायचे ?

·      व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेळीपालन मधून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल ?

·      सुरुवातीला कोणती जात निवडायची ?

·      असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. या सर्व गोष्टींचा आपण या लेखात व या पुढील लेखांमध्ये सविस्तर अभ्यास करूया.

 

 

शेळीपालनात - नेहमी विचारले जाणारे
·      १. शेळी पालनासाठी लहान पिल्ले/ करडे कोठे मिळतील?
·      उत्तर: शेळीचे लहान करडू माहितीसाठी औरंगाबाद येथील शासकीय शेळी पैदास केंद्र पडेगाव येथे संपर्क साधावा. किंवा  नजीकच्या     पशुसंवर्धन विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या संबंधी    अधिक माहिती घ्यावी.
·      २. शेळी पालन केल्या नंतर त्याची विक्री कशी करायची?
·      उत्तर: स्थानिक गुरांच्या बाजारपेठेत बोकड विक्री करता येतात. मादी     शेळ्या काही शेळी प्रकल्पांना देता येतात. शेळी फार्म सुरु आल्यावर ग्राहक फार्म वरून सुद्धा शेळ्या/बोकड विकत घेऊन     जातात असा अनुभव आहे.
·      ३. शेळी पालनासाठी काही शासकीय योजना आहेत का? त्या साठी कुणाशी संपर्क करावा?
·      उत्तर: शेळी पालनाविषयी काही सरकारच्या योजना आहेत. अधिक    माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील उप आयुक्त पशुसंवर्धन     कार्यालयाशी संपर्क साधावा.
·      ४. शेळी पालनासाठी उत्तम जात कोणती?
·      उत्तर: उस्मानाबादी शेळी दूध आणि मांसासाठी प्रसिध्द आहे. बोअर     (अफ़्रिकन) जातीची शेळी खास मांसासाठी जास्त फायदेशीर आहे.     उस्मानाबादी शेळीला संपूर्ण शेतात फ़िरुन वेगवेगळा चारा खाण्याची सवय असते. बोअर जातीच्या शेळ्या ह्या गायी म्हशी     सारख्या चारा खातात. आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयीनुसार वरीलपैकी जातीची निवड करा.
·      ५. शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पहिल्यादा काय करायला लागेल?
·      उत्तर: शेळी पालन करण्या पूर्वी या बाबतची सर्व माहिती घ्यावी, या     विषयावर प्रशिक्षणे उपलब्ध आहेत,त्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे.     काही सुरु असलेल्या शेळी फार्म ला भेट द्यावी आणि नंतरच सुरु    करावे !!!
·      ६. शेळ्यांना चारा/ खाद्य काय द्यावे? आणि कोणत्या वेळेत द्यावे?
·      उत्तर: १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा    चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे.    सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ इ. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात.
·      ७. शेळ्यांना चारा कोणत्या वेळी व काय द्यावा?
·      उत्तर: १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा    चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे.    सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ ए. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात
·      ८. शेळी पालनासाठी प्रशिक्षण केंद्र व पत्ता, शेळ्या मिळण्याचे ठिकाण या संबंधी माहिती द्या.
·      उत्तर-शेळी पालनासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशिक्षण राबवले   जातात. प्रशिक्षणासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा उप     आयुक्त पशुसवर्धन यांच्याशी संपर्क साधावा आणि योग्य    मार्गदर्शन घ्यावे. तसेच आपल्या जवळच्या पशुमहाविद्यालय    किंवा काही ठिकाणी चालू असलेल्या शेळी फार्मला भेट द्यावी
·      तसेच शेळी पालन व्यवसाया संबधी योजना बाबत अहिल्याबाई होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ गोखलोनगर पुणे ४११०५३ महात्माफुले विकास महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र यांचेशी संपर्क साधावा.
(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद



No comments:

Post a Comment