शेळीपालनातील तंत्र – मंत्र
शेळीपालन व्यवसाय अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवून, फसवणूक करून थोडे दिवस करण्यापेक्षा, शास्त्रीय
दृष्टिकोन ठेवून, व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन
आयुष्यभरासाठी फायदेशीर करता करता येतो. त्यासाठी गरज अाहे कष्ट आणि जिद्दीबरोबर
शास्त्रीय दृष्टिकोनाची ठेवण्याची.
शेळीपालन व्यवसाय अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवून, फसवणूक करून थोडे दिवस करण्यापेक्षा, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून, व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन आयुष्यभरासाठी फायदेशीर करता येतो. त्यासाठी गरज अाहे कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोन ठेवण्याची.
शेळीपालन मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यशस्वी शेळीपालन व्यवसायासाठी आवश्यक तेवढी जागरूकता आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली, तरच या व्यवसायामध्ये आर्थिक यश मिळू शकते. हे लेक्षात ठेवूनच शेळीपालन व्यवसायाला सुरवात करावी.
शेळीपालन व्यवसाय अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवून, फसवणूक करून थोडे दिवस करण्यापेक्षा, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून, व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन आयुष्यभरासाठी फायदेशीर करता येतो. त्यासाठी गरज अाहे कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोन ठेवण्याची.
शेळीपालन मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यशस्वी शेळीपालन व्यवसायासाठी आवश्यक तेवढी जागरूकता आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली, तरच या व्यवसायामध्ये आर्थिक यश मिळू शकते. हे लेक्षात ठेवूनच शेळीपालन व्यवसायाला सुरवात करावी.
शेळीपालनातील
तंत्र – मंत्र
· गोठ्याची
जागा योग्य निवडली आहे का?, गोठ्याची रचना आवश्यकतेनुसार व
वातावरणानुसार अाहे का? याची खात्री करावी. आजारी शेळ्या
तसेच नवीन खरेदी केलेल्या शेळ्या ठेवण्यासाठी वेगळी जागा आहे का?
· गोठ्यावरील
विविध कामांचे वेळापत्रक अाणि जैविक संवर्धनाची सोय-:
शेळ्यांचे निराक्षण करून त्या कुठल्या रोगांना बळी पडत आहेत का, हे पाहावे व विशेष काळजी किंवा आवश्यक बदल करावा.
शेळ्यांचे निराक्षण करून त्या कुठल्या रोगांना बळी पडत आहेत का, हे पाहावे व विशेष काळजी किंवा आवश्यक बदल करावा.
· योग्य
ठिकाणावरून योग्य वयाच्या शेळ्या आवश्यक शारीरिक स्थितीनुसार खरेदी कराव्यात.
शेळ्यांची
वाहतुकीपूर्वी, दरम्यान व वाहतुकीनंतर योग्य काळजी
घ्यावी.
गोठ्याची
स्वच्छता अाणि प्रजनन व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे.
लसीकरण
व जंतनिर्मूलन आवश्यकतेनुसार करणे अतिशय आवश्यक आहे.
गोठ्यामध्ये
शेळ्या वेगवेगळ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे व शारीरिक स्थितीनुसार शेळ्यांची
विभागणी करावी.
दैनंदिन
व महिनाभराच्या कामांची यादी करणे आवश्यक.
नोंदवहीमध्ये
रोजच्या नोंदी ठेवणे आवश्यक.
मृत
शेळ्यांचे शवविच्छेदन करून आजार ओळखावा व इतर शेळ्यांवर त्यानुसार उपचार करावे.
वेळोवेळी
शेळ्यांमध्ये रक्त, लेंडी या नमुन्यांच्या चाचण्या
कराव्या. ज्याचा उपयोग योग्य व्यवस्थापनासाठी होईल.
वेगवेगळ्या
ऋतुंनुसार व्यवस्थापनात आवश्यक बदल करावे.
गोठ्याचे
आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण करावे.
प्रथमोपचारानंतर
शेळ्या बऱ्या होण्याची वाट बघण्यापेक्षा तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी, उपचार व मार्गदर्शन घ्यावे.
चारा
पिकांची लागवड करून ओला चारा व वाळला चारा व खुराकाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक.
शेळ्यांमध्ये
योग्य वेळी, योग्य खाद्याची यादी बनविणे. उदाहरणार्थ,
गाभण शेळीचा आहार, बोकडाचा आहार इत्यादी.
शेळ्यांना
स्वच्छ पाणी द्या. शेळ्यांचा चारा गव्हाणीत द्या, जेणेकरून तो वाया
जाणार नाही.
बोकडांचे
विक्रीनियोजन करा व त्यानुसार पैदास करा.
शेळीपालन
करताना कमीत कमी १० गोठे पाहा व व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण घ्या.
निरूपयोगी
शेळ्या गोठ्यातून काढून टाका.
शेळ्यांचा
विमा उतरवा.
कमीत
कमी किंवा ० टक्के मरतूक आणि
बोकडांमध्ये चांगली वजनवाढ या व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक
आहेत.
शेळ्या
जिवंत वजनावर विकणे फायदेशीर.
विक्रीनियोजनात
स्वतःचे मटणाचे दुकान असल्यास जास्तीत जास्त फायदा.
* शेळीच्या मटणाच्या
निर्यातीवर लक्ष व भर दिल्यास भरपूर फायदा.
दुसऱ्याचा
गोठा बघून हुबेहूब कॉपी करण्याचा प्रयत्न न करता आपल्या स्थितीनुसार नियोजन
केल्यास जास्त फायदा.
स्वतःच्या
गोठ्यावर स्वतःचे लक्ष असणे अतिशय आवश्यक.
सुरवातीस
खूप मोठा गोठा व खर्च टाळावा.
स्वतःच्या
शेळ्यांची विक्री करताना सरळ शेवटच्या ग्राहकांशी व्यवहार केल्यास जास्तीत जास्त
फायदा.
गोठ्यावर
विविध नोंदी ठेवून त्या नोंदींचे वेळोवेळी पृथक्करण करून आवश्यक बदल फायद्याचे
ठरतात.
शेळ्यांपासून
दोन पिल्ले मिळावीत व दोन वेतातील अंतर जास्तीत जास्त आठ महिने असावे.
शेळीपालनातील
नवीन बदल स्वीकारून मग योग्य नियोजन करणे आवश्यक.
विक्री
व्यवस्थापनासाठी आपल्याकडील स्थानिक जत्रांची यादी करून पूर्वनियोजन करून विक्री
करावी.
शेळ्यांची
वंशावळ बघून व जातिवंतपणा बघून पैदास करावी व पैदाशीच्या शेळ्या म्हणून विक्री
करावी.
एका
वेळी २०+१ पेक्षा मोठ्या संख्येने सुरवात केल्यास जास्त अडचणी येतात.
रोगाची
लागण झाल्यावर उपचारांवर जास्त खर्च करण्यापेक्षा गोठ्यावर रोग येणारच नाही असे
व्यवस्थापन करावे.
नवीन
शेळ्या कमीत कमी २१ दिवस गोठ्यावरील जुन्या शेळ्यांमध्ये मिसळणे टाळावे.
व्यवसायाचा
मूळ उद्देश लक्षात घेऊन नियोजन करावे.
शेळ्यांना
आवश्यकतेनुसार खनिजमिश्रण द्या.
शेळीपालन
व्यवसाय हा शून्य खर्च व शून्य देखभाल (Zero maintenance) करून
जास्तीत जास्त उत्पन्न पाहिजे असा अट्टहास करू नका.
शेळीपालन
व्यवसायात नियमित सुधारणेबरोबरच संयम ठेवल्यास यश मिळतेच.
शेळीपालनात
चुकीचे मार्गदर्शन करू नका. जेणेकरून व्यवसायाची बदनामी होईल.
(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार
शेतकरी मित्रहो
‘ शिंत्रे अॅग्रो
फार्म ’ बेरोजगार, शेतकरी
व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती
पुरुवुन शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता ‘शेतीत
जीव रंगला ’ या
लेखमालिकेचा प्रवास सुरु करत
आहे.
हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती व शेतीपूरक व्यवसायातील सखोल
माहिती पुरवुन शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस
सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन
पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो टेलिग्राम (Telegram) ग्रुपला
जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
या
लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या
सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी
व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद
No comments:
Post a Comment