Monday, January 14, 2019

अर्धबंदीस्त शेळीपालन



अर्धबंदीस्त शेळीपाल


अर्धबंदिस्त शेळीपालन
शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते.त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही.त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.
अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता

शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपे खातात जर आपण शेळयांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया
प-हाटया यांच्या सहायाने करावे
2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान 3 ते 4 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे
4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अलग करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत
8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
शेळीपालनाची वैशिष्टये
*हवामान :- शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरडया             हवामानात शेळीची वाढचांगली होते.
* आहार :- शेळीच्या आहारात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ,                             चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो.
* जागा :-  शेळीसाठी जागा कमी लागते.
*भांडवल :- भांडवल कमी लागते.
* गर्भकाळ :- शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या
         गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्या कालावधीचा असतो व            भाकडकाळ कमी असतो.
* दुध :-   शेळीचे दुध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक             उपयुक्त असते.
* लेंडीखत :-शेळीच्या लेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून फार किंमत आहे. टाक शेळी           वर्षाला २०० किलो लेंडीखत देते.
अर्धबंदीस्त शेळीचे व्यवस्थापन
1)
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया -हाटया यांच्या सहायाने करावे
2)
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
3)
शेळयांना मोकळया जागेत ठेवावे
4)
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
5)
गाभळ शेळयाची दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
6)
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
7)
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत
8)
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदे
बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत.व्यवस्थापन, गोठा बांधणी व देखभाल खर्चात बचत होते.
अर्धबंदिस्त शेळीपालनाचे तोटे
शेळी फार्म-बकऱ्यांचे दूध मशीननेही काढतात
इतर अथवा रोगी शेळ्यांचे संपर्कात आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव.त्यांनी किती खाल्ले याचे मोजमाप करता येत नाही सबब उपसमारीची शक्यता.तरीही गोठा आवश्यक असतो.
(हे लेख संग्रहीत आहेत लेखकाचे आम्ही आभारी आहोत)
नमस्कार शेतकरी मित्रहो
  शिंत्रे अॅग्रो फार्म बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना पारंपरिक शेती बरोबर इतर जोडधंद्याची माहिती पुरुवु शेतीतून श्रीमंत उद्योजक करणे याकरता शेतीत जीव रंगला या लेखमालिकेचा प्रवास सुरु करत आहे.
 हे लेख दररोज प्रकाशित होतील. यामधे शेती शेतीपूरक व्यवसायातील सखोल माहिती पुरवु शेतीपूरक उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत होईल. सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आपणाला हे लेख दररोज मिळण्याकरता आपण आमच्या
शिंत्रे अॅग्रो  टेलिग्राम (Telegram) ग्रुपला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो यू ट्यूब चॅनेला जॉइन होण्यासाठी
शिंत्रे अॅग्रो फेसबुक पेजवर जॉइन होण्यासाठी https://www.facebook.com/groups/769049360097247/
या लिंक वर क्लिक करुन जॉइन व्हा. तसेच आपल्या मित्रांनाही जॉइन करा. जेणेकरून वर्षभर हे सर्व उत्तम मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळेल.
तुमचे यश हेच आमचे लक्ष्य, हमखास यश मग आजच जॉइन व्हा
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व ग्रुप वरती सेंड करून समाजातील होतकरू बेरोजगार, शेतकरी व नोकरदार यांना ह्याचा लाभ पोहोचवा ही नम्र विनंती
धन्यवाद


No comments:

Post a Comment